Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

Pune Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. वाढते तापमान आणि वाढती आर्द्रता यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व रहिवाशांची चिंता वाढली आहे.
Pune Weather Update
Cloudy skies over Pune as residents await rainfall while the weather department predicts a dry spell for the next four days.saam tv
Published On
Summary
  • पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.

  • पुढील चार दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज

  • शहरासह ग्रामीण भागात तापमान आणि उकाड्यात लक्षणीय वाढ

गेल्या एका आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरांसह ग्रामीण भागातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसांने उसंत घेतल्यानं शेतकरी चिंतेत पडले आहेत. त्याच दरम्यान हवामान विभागाने वतर्वलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. त्यामुळे सध्या पुणेकरांना वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Pune Weather Update
PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

पुणे शहर आणि उपनगर परिसरात सोमवारी (ता. १३) कमाल तापमानात आणखी एक अंश सेल्सिअसने वाढ नोंदविण्यात आली आहे. शहरात ३२ अंश सेल्सिअस कमाल, तर २३.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय. सोमवारी सकाळपासूनच आकाश निरभ्र होत. कडक ऊन पडल्याने उकाड्यात मोठी वाढ जाणवली. तर पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून पावसाची विश्रांती कायम राहणार आहे.

Pune Weather Update
Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

मंगळवारी देखील पुणे आणि परिसरातील कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि दुपारनंतर किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिना अर्धा संपला असून अनेक भागात पाऊस नाहीये. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची तूट आहे. मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यात पावासने हजेरी लावलीच नाही.लातूर, बीड,सोलापूर,यवतमाळ,परभणीमध्ये पावसाची आकडेवारी मायनसमध्ये असल्याची नोंद करण्यात आलीय. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर १ जुलै ते ८ जुलै दरम्यान मान्सून सक्रिय राहिला होता. त्या कालावधीत बऱ्यापैकी पाऊस झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com