Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

Mumbai Water Storage : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
MUMBAI WATER STORAGE REACHES 49.83% AS HEAVY RAIN BOOSTS RESERVOIR LEVELS, VIHAR AND TULSI LAKES OVERFLOW
MUMBAI WATER STORAGE REACHES 49.83% AS HEAVY RAIN BOOSTS RESERVOIR LEVELS, VIHAR AND TULSI LAKES OVERFLOWSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईच्या सातही धरणातील पाणीसाठ्यात वाढ

  • एकूण जलसाठा 49.83 टक्क्यांवर पोहचला

  • मुंबईकरांना दिलासा

  • मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाची दोन धरणे ओव्हर फ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख जलाशयांच्या परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून, मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

BMCने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १० जुलै ते ११ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे सातही तलावांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ७,२१,२७८ दशलक्ष लीटरपर्यंत पोहोचला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ४९.८३ टक्के इतका आहे. मुंबईला वर्षभर अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १४,४७,३६३ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते.

MUMBAI WATER STORAGE REACHES 49.83% AS HEAVY RAIN BOOSTS RESERVOIR LEVELS, VIHAR AND TULSI LAKES OVERFLOW
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

विशेष म्हणजे, मागील काही दिवसांत तलावांमधील पाणीसाठ्यात ०.४२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे संभाव्य पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईच्या जलसाठ्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे दोन तलाव आधीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील विहार तलाव ७ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. सध्या या तलावात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुळशी तलावही ७ जुलैच्या रात्री पूर्ण क्षमतेने भरला असून तो देखील ओसंडून वाहत आहे. या दोन्ही तलावांमध्ये उपलब्ध झालेला पूर्ण जलसाठा मुंबईकरांसाठी सकारात्मक मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com