Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Pune Water Issue: पुणे शहरामध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील अनेक भागांना याचा फटका बसणार आहे. २४ तास पाणी येणार नसल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Pune Water Cut UpdateSaam Tv
Published On
  • पुणे महानगरपालिकेकडून गुरुवारी पाणीपुरवठा बंदची घोषणा

  • पुणे शहरात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

  • पर्वती, कोथरूड, बाणेर, कात्रज भागात पाणीपुरवठा बंद

  • पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील अनेक प्रमुख भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा अतिवापर टाळावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पुणे महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठा आणि नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याच्या (सिंहगड रस्ता) भागात नियमित पाणीपुरवठा होईल. बुधवारी रात्री १२ ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमधील पाणी पुरवठा बंद राहिल. पेठा, सिंहगड रस्त्यावरील पाणीपुरवठा मात्र सुरळीत राहिल, असे पालिकेने सांगितले.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Pune : पुण्यात भयंकर दुर्घटना! तरूणी धावत्या PMPML बसमधून पडली, मागून येणाऱ्या स्कुल बसने चिरडले

पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग -

पर्वती परिसर सहकारनगर -

पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, चिंतामणीनगर, गंगाधाम, अप्पर व लोअर इंदिरानगर, लेकटाउन, डायस प्लॉट सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण, जनता वसाहत व लगतचा परिसर.

भामा आसखेड लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व संलग्न परिसर.

कोथरूड, बावधन व कर्वेनगर -

संपूर्ण बावधन, भुसारी कॉलनी, पौड रस्ता, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, विठ्ठल मंदिर, सहवास, गोसावी वस्ती, करिश्मा परिसर, नळस्टॉप ते दशभुजा गणपती, मंगेशकर रुग्णालय परिसर, महात्मा सोसायटी, वारजे माळवाडी, तपोधाम, काकडे सिटी, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, कॅनॉल रस्ता.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

बाणेर, बालेवाडी व पाषाण -

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, सूस रोड, भूगाव, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, गणराज चौक, पॅनकार्ड क्लब परिसर.

औंध व शिवाजीनगर परिसर -

गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता व परिसर, खडकी, सकाळनगर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Pune Waterfall : पुण्याजवळचा 'हा' धबधबा निसर्ग प्रेमींसाठी स्वर्ग! पावसाळ्यात वीकेंडला नक्की ट्रिप प्लान करा

कात्रज व धनकवडी -

संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक व खुर्द, वंडर सिटी, बालाजीनगर, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज गावठाण, येवलेवाडी.

खडकीव कँटोन्मेंटः मुळा रोड -

खडकी कँटोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, हरिगंगा सोसायटी.

शिवणे व उत्तमनगर-

वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे धावडे.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com