कोर्टाचा मोठा निर्णय! जावयाच्या हत्येप्रकरणी पत्नीसह सासरच्या पाच जणांना जन्मठेप

Pune Court Sentences Wife And In Laws To Life Imprisonment: पुण्यातील विनोद भगत हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी नंदा भगतसह सासरच्या चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
PUNE COURT VERDICT
PUNE COURT VERDICTsaam tv
Published On: 

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि सासरच्या मंडळींना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने सासरी जाऊन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून जावयाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पत्नी, सासू, सासरे आणि तीन मेहुण्यांपैकी पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपी महिलेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

PUNE COURT VERDICT
Maharashtra : महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिवपदासाठी हालचालींना वेग; 'ही' ३ नावे चर्चेत

मिळालेल्या महितीनुसार, विनोद भगत असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भगत, सासरे जयसिंग चिव्हे, मेहूणे सचिन चिव्हे, पांडुरंग उर्फ चिव्हे आणि सासू विमल चिव्हे (सर्व रा. चिव्हेवाडी, ता. पुरंदर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर लता चिव्हे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जानेवारी २०१९ मध्ये ही घटना घडली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने विनोद भगत सासरी गेला होता. त्यावेळी त्याने सासरच्या मंडळींना शिवीगाळ केली होती. याचाच राग मनात धरून पत्नी नंदा आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी विनोदच्या घरी जाऊन त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात विनोदचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

PUNE COURT VERDICT
Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जानेवारी २०२४ पासून या खटल्यातील पुरावे नोंदवण्यास सुरुवात झाली. सुनावणीदरम्यान, घरात घुसून हल्ला करणे आणि त्यातून एखाद्याचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याची क्रूरता लक्षात घेता दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

PUNE COURT VERDICT
Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह महिला पोलिसाचं तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ; कारणेही तितकीच धक्कादायक

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पत्नी नंदा भगतसह सासरच्या पाच जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पुणे जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.