Maharashtra : महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिवपदासाठी हालचालींना वेग; 'ही' ३ नावे चर्चेत

Maharashtra Government News : महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल ३० नोव्हेंबरला निवृत्त होणार. त्यांच्या जागी मनीषा म्हैसकर, संजय सेठी आणि मिलिंद म्हैसकर यांची नावे चर्चेत.
Maharashtra Government News
Maharashtra Government News AI Image
Published On: 

महाराष्ट्र प्रशासनात सध्या नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अग्रवाल यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारने अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवलेला नाही.

नव्या मुख्य सचिवपदासाठी सध्या तीन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत. यामध्ये गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही अधिकारी 1992 च्या बॅचचे आहेत.

Maharashtra Government News
Bank Closed : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी

वरिष्ठतेचा विचार केला तर मनीषा म्हैसकर यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यानंतर संजय सेठी आणि मिलिंद म्हैसकर यांचा क्रमांक लागतो. या चर्चेला आणखी एक महत्त्वाची बाब जोडली गेली आहे. मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या तारखाही वेगवेगळ्या आहेत. संजय सेठी सप्टेंबर 2029 मध्ये, मिलिंद म्हैसकर नोव्हेंबर 2028 मध्ये, तर मनीषा म्हैसकर मार्च 2029 मध्ये निवृत्त होणार आहेत.

Maharashtra Government News
Gold Rate Today : सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक! एक तोळ्यामागे १,४८० रुपयांची वाढ; वाचा आजचे ताजे दर

मुख्य सचिवपदासाठी केवळ ज्येष्ठतेचा विचार केला जात नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांचा प्रशासकीय अनुभव, कामाचा आढावा आणि उर्वरित सेवाकाळ यांनाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना राज्य सरकार कोणत्या गोष्टींना प्राधान्य देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजेश अग्रवाल यांना मुदतवाढ मिळणार की नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.