IT engineer and son drown in Indrayani River Pune
Indrayani River Tragedy: IT Engineer and Son from Pimpri-Chinchwad drown, wife hospitalized in critical condition.Saam TV News

Pune : कोल्हापूरचा IT इंजिनिअर इंद्रायणीत बुडाला, बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

IT engineer and son drown in Indrayani River Pune : पिंपरी-चिंचवडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुंडमळा येथील इंद्रायणी नदी पात्रात पाय घसरून बाप-लेकाचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी आहे.
Published on

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Pimpri - Chinchwad, Pune News : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल अपघातात पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. रोहित सुधीर माने असं मृत आयटी इंजिनिअरचं नाव आहे. रोहित बायको आणि मुलासोबत कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी काळाने घाला घातला. या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोहित सुधीर माने (वय 30 वर्ष) आणि विहान सुधीर माने (वय 5 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या बाप लेकांची नावं आहेत. तर शमिका सुधीर माने (वय 28 वर्ष) ही ह्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. रोहित सुधीर माने हा मूळचा कोल्हापूरचा असून तो एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करत होता. रोहित सुधीर माने हा पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत चिंचवडच्या नक्षत्र सोसायटीमध्ये वास्तव्यास होता. तो रविवारी सुट्टी असल्यामुळे फिरण्यासाटी कुंडमळा येथे गेला होता. पण तिथेच काळाने घाला घातला.

IT engineer and son drown in Indrayani River Pune
Godavari River Tragedy : दर्शनाआधी गोदावरीत अंघोळीसाठी उतरले, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू | VIDEO

काही महिन्यापूर्वीच रोहितने नक्षत्र सोसायटीमध्ये एक फ्लॅट विकत घेतलं होतं. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रोहित आपली पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत कुंडमळा या ठिकाणी वर्षाविहार पर्यटनासाठी गेला होता. मात्र त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील जीर्ण झालेल्या पुलावर झालेली पर्यटकांची मोठी गर्दी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे पर्यटकांनी केलेल्या दुलर्क्षामुळे आज रोहित आणि त्याचा मुलगा विहानला आपलं जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत शमिका माने ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आपला पती आणि मुलगा आपल्याला कायमचा सोडून गेला आहे, याची कल्पना देखील अजूनही शमिकाला दिली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचवड परिसरावर शोककळा पसरली आहे.

IT engineer and son drown in Indrayani River Pune
Indrayani River Bridge: ४ जणांचा मृत्यू, ५१ जणांना वाचवलं, इंद्रायणीमध्ये आणखी किती जण बेपत्ता, महत्त्वाची माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com