Indrayani River Bridge: ४ जणांचा मृत्यू, ५१ जणांना वाचवलं, इंद्रायणीमध्ये आणखी किती जण बेपत्ता, महत्त्वाची माहिती समोर

Indrayani river Kundmala bridge: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल रविवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ५१ जणांना वाचवण्यात यश आले.
Pune Indrayani River Bridge Collapsed
NDRF team rescues survivors after Kundmala bridge collapse in Pune’s Maval; 4 dead, several injured, and search continues for the missing.Saam Tv News
Published On

Pune Indrayani Kundmala river bridge collapse News Update : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला अन् अनेकजण वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५१ जणांना वाचवण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते. पण सततच्या पावसामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय, आणखी तीन ते चार जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीआरएफचे जवान आज पुन्हा नदीत उतरणार आहेत. ज्यावेळी इंद्रायणी नदीवरून पूल कोसळला त्यावेळी तिथे १०० पेक्षा जास्त पर्याटक असल्याचं सांगण्यात येत आहे.

८ जणांची प्रकृती गंभीर - Kundmala Pune bridge collapse survivors and victims

पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल रविवारी दुपारच्या वेळीस कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. पूल कोसळला तेव्हा सुमारे १०० पर्यटक उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) रविवारी रात्रीपर्यंत ५१ जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढले. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पवना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात १० जणांवर उपचार झाले, त्यापैकी दोघे आयसीयूमध्ये होते, तर उर्वरितांना किरकोळ जखमांमुळे घरी सोडण्यात आले. अथर्व रुग्णालयात १७ जणांवर उपचार सुरू असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Pune Indrayani River Bridge Collapsed
Pune : शिक्षणाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार, पुण्यातील १३ शाळा अनधिकृत, २४ शाळा जागेवरच नाहीत

आणखी दोन ते तीन जण बेपत्ता -

काल रात्रीपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग वाढला आहे. यामुळे एनडीआरएफसमोर बचावकार्यासाठी मोठे आव्हान आहे. पूलाचा लोखंडी सांगाडा रविवारी रात्री नदीतून काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनुसार, आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफने सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू केले. प्रशासनाकडे बेपत्ता लोकांची नेमकी संख्या उपलब्ध नसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ युद्धपातळीवर कार्यरत असून, पावसामुळे बचावकार्य कठीण बनले आहे.

Pune Indrayani River Bridge Collapsed
Maharashtra Weather : धडकी भरवणारा पाऊस कोसळणार, रायगडला रेड अलर्ट, पुणे-मुंबईतही धो धो कोसळणार

दोषींवर कठोर कारवाई करणार, अजित पवार

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Pune Indrayani River Bridge Collapsed
Encounter : मोठी बातमी! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com