

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरात दोन दिवस वाहतूक बदल करण्यात आली आहे. आज आणि उद्या पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव विविध मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ राहणार असून, अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस पुण्यात ‘नो पार्किंग’ रस्ते असणार आहेत.
मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी, जिल्हा परिषद, नेहरू मेमोरियल हॉल, जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात सोमवारी अजित पवार यांच्या पुतळ्याचे अमित शहा यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते नेहरू मेमोरियल हॉल येथे दुपारी १२ वाजता अजित पवार यांच्या कार्यावरील कॉफीटेबल बुकचे प्रकाशन आणि लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
- टेक्निकल एअरपोर्ट ते विमाननगर, रामवाडी, एबीसी चौक ते भारत फोर्ज कंपनी.
- नॉर्थ मेन रस्ता, जहाँगीर चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते बोपोडी हॅरिस पूल.
- संचेती चौक, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता.
- इंजिनिअरिंग कॉलेज चौक, शाहीर अमर शेख चौक, जिल्हा परिषद ते नेहरू मेमोरियल चौक.
- जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक चौक ते टिळक रस्ता.
- फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सिमला ऑफिस चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी, सादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोल्फ क्लब आणि ५०९ चौक ते टेक्निकल एअरपोर्ट.
टिळक रोड ते साहित्य परिषद ते बादशाही चौक ते पेरू गेट चौकी ते पावन मारुती मंदिर ते भरत नाट्य मंदिर ते इतिहास मंडळ या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना सोमवारी सकाळी ९ ते भारत इतिहास मंडळ येथील कार्यक्रम संपेपर्यंत नो पार्किंग झोन करण्यात आले आहे.
१५ ते १६ नोव्हेंबरपर्यंत पुण्यात सर्व प्रकारची जड/ अवजड वाहने तसेच मिक्सर, डंपर, हायवा, जेसीबी, रोड रोलर, ट्रक्टर या सर्व वाहनांना बंदी असणार आहेत. व्ही. व्ही. आय. पी मार्ग आणि त्यास जोडणाऱ्या मार्गांवर या सर्व वाहनांना बंदी असेल.
सकाळी ९ वाजल्यापासून ‘नो पार्किंग’: लोकमान्य टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही चौक, पेरूगेट चौकी, भरत नाट्य मंदिर ते भारत इतिहास संशोधक मंडळ.
सकाळी ७ वाजल्यापासून बंद रस्ते - किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक
(पर्यायी मार्ग : जीपीओ किंवा ब्लू नाईल हॉटेल चौक) आणि दोराबजी मॉल ते ब्लू नाईल चौक
सदर मार्गावरील वाहनांनी किराड चौक येथून जी.पी.ओ मार्गे किंवा ब्लू नाईल हॉटेल चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.