मोठी बातमी! सुनेत्रा पवार अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण!

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी अचानक भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान झालेल्या या भेटीचं नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुनेत्रा पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का गेल्या आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार थेट मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीला गेल्याने नेमकं काय सुरू आहे? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "आम्हाला विचारल्याशिवाय किंवा विश्वासात घेतल्याशिवाय विलीनीकरण होणार नाही," असे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.