

Summary -
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या त्रासाला कंटाळून पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल
सुसाईड नोट लिहित पोलिस झाला बेपत्ता
सोशल मीडियावर भावनिक सुसाईड नोट होते व्हायरल
पुणे पोलिस दलात खळबळ
वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून एक पोलिस कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे जिल्ह्यातल्या यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आणि मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याने पोलिस दलातील एक कर्मचारी मी जीवाचे बरे वाईट करत असल्याची पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून गायब झाला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले आहे. त्या स्टेटस वर त्यांनी स्वतःच्याच फोटोवरच भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुलीसाठी असे लिहिले आहे की, 'माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार- पाच दिवसांपूर्वी तू आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य करण्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाता आले नाही.यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेल्या १ वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा'
पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी स्वतःच्याच फोटोवर 'केलेल्या कामाची पोच पावती आहे. भावपूर्ण श्रद्धांजली' लिहून स्टेटस ठेवला होता. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट करून निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले असून त्यांचा गुरुवारपासून फोन बंद आहे. निखिल रणदिवे यांची गेल्या एक वर्षापूर्वीच बदली झाली होती. परंतु यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडले नाही. या त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे हे जीवाचे बरे वाईट करत आहे असे म्हणत मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यांचा फोन बंद लागत आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून अद्यापही त्यांची दखल घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
निखिल रणदिवे यांनी सुसाईड नोट देखील लिहिली आहे. या सुसाई़ड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, 'यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे १ वर्षांपासून मानसिक त्रास देत आहेत. माझी सन २०२५ मध्ये शिक्रापूर पोलिस ठाण्यात सर्वसाधरण बदली झाली. परंतु, मला बदली ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास दिला जात आहे. सदर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देऊन खच्चीकरण करत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस नारायण देशमुख जबाबदार आहेत.' पोलिस नाईक निखिल रणदिवे यांची सुसाईड नोट समोर आल्यानंतर पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.