पुण्यातील २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं प्रकरण काय?

Two Pune Cops Suspended: पुणे गुन्हे शाखेतील २ पोलीस कर्मचाऱ्यांना मटका रॅकेटशी संपर्कामुळे निलंबित. कॉल रेकॉर्ड्समुळे पोलिसांचा संपर्क उघडकीस.
Two Pune Cops Suspended
Two Pune Cops SuspendedSaam
Published On

पुणे पोलीस दलातून खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. गुन्हे शाखा युनिट -१ मधील २ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मटका जुगार चालवणाऱ्या रॅकेटशी संपर्क ठेवल्याच्या गंभीर आरोपांवरून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल यांनी केली आहे. पोलीस हवालदार शुभम जयवंत देसाई आणि अभिनव बापुराव लडकत अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, समर्थ पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी अवैध मटका जुगार चालवणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला. तपासादरम्यान, यातील एकाचा मोबाईल तपासला असता त्याच्या मोबाईलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क झाल्याचे आढळून आलं.

Two Pune Cops Suspended
काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

अधिक पडताळणी करीत असताना हवालदार शुभम देसाई हे आरोपीच्या मोबाईलवर कॉल करत होते. या कॉलवर ते आरोपीबरोबर संशयास्पदरित्या संपर्कात होते हे दिसून आलं. हा संपर्क संशयास्पद पद्धतीने असल्याचं पोलिसांनी नमूद केलं. या फोन कॉल्सवरून पोलिसाचे आरोपीशी आणि चालवित असलेल्या धंद्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Two Pune Cops Suspended
दारूसाठी पैसे देण्यास नकार; तरुणाची सटकली, आईला जिवंत जाळलं

यापूर्वी त्यांना वारंवार या संदर्भात सुचना दिल्या होत्या. तरी सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा झाल्याचे दिसून आलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं. अखेर पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलीस हवालदार शुभम देसाई आणि अभिनव लडकत यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com