दारूसाठी पैसे देण्यास नकार; तरुणाची सटकली, आईला जिवंत जाळलं

Man Sets His 65-Year-Old Mother on Fire Over Alcohol Money: ओडिशामध्ये मुलानं आईला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून त्यानं हे कृत्य केलं.
Man Sets His 65-Year-Old Mother on Fire Over Alcohol Money
Man Sets His 65-Year-Old Mother on Fire Over Alcohol MoneySaam
Published On

ओडीशाच्या भद्रक जिल्ह्यातून लेक आणि आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानं चक्क आपल्या वृद्ध आईला जाळून टाकलं आहे. आईनं दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला होता. तरूणाला संताप अनावर झाला. त्यानं आईला जिवंत जाळलं. गंभीर दुखापतींमुळे महिला जमिनीवर कोसळली. तिच्या शरीराचा बराचसा भाग भाजला असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.

ही भयानक घटना भद्रक जिल्ह्यातील तिहिडी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. देबाशिष नायक (वय वर्ष ४५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तो गलगंडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देबाशिषने वृद्ध आईकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, आई ज्योत्सनारानी नायक (वय वर्ष ६५) यांनी पैसे देण्यास थेट नकार दिला.

Man Sets His 65-Year-Old Mother on Fire Over Alcohol Money
काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलानं संतापून आईवर हल्ला केला. गंभीर दुखापतींमुळे महिला बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. आई जमिनीवर पडल्यानंतर आरोपीनं त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच पेटवून दिले. महिला शुद्धीवर येण्यापूर्वीच देबाशिषने त्यांना जाळून टाकले. महिलेनं आरडाओरड केला. मुलगा पळून गेला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले.

Man Sets His 65-Year-Old Mother on Fire Over Alcohol Money
सुखी संसारात पडला मिठाचा खडा, चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्यानं बायकोला संपवलं, बांबूच्या काठीनं मारलं नंतर..

पोलिसांनी सांगितले की, महिलेचा बराचसा भाग जळाला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देबाशिषला ड्रग्जचे व्यसन आहे. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Man Sets His 65-Year-Old Mother on Fire Over Alcohol Money
सेxxx रॅक्टचा पर्दाफाश, भाजप महिला नेत्यावर आरोप, संतप्त होत सांगितलं तो फ्लॅट नेमका कुणाचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com