सुखी संसारात पडला मिठाचा खडा, चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्यानं बायकोला संपवलं, बांबूच्या काठीनं मारलं नंतर..

Woman Killed by Husband in Amravati: चरित्रावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची निर्घुण हत्या..अमरावती जिल्ह्यातील खैरी दोनोडा येथील घटना.. बांबूच्या काठीने पत्नीवर केला वार..
Woman Killed by Husband in Amravati
Woman Killed by Husband in AmravatiSaam
Published On

अमरावतीतून पती - पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पतीला पत्नीवर संशय होता. याच संशयातून नवऱ्यानं बायकोची हत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तसेच आरोपीला पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर २ मुले पोरकी झाली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील खैरी दोनोडा येथे घडली आहे. सबाना भोसले असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. तर, जानराव भोसले असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचाही संसार खैरी दोनोडा गुण्यागोविंदाने सुरू होता. मात्र, या संसारात संशय नावाचा मिठाचा खडा पडला.

Woman Killed by Husband in Amravati
महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत वाहतूकीत बदल; काही मुख्य रस्ते बंद, तर काही वन वेवर सुरू

नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे दोघांमध्ये कायम भांडणं होत. मात्र, घटनेच्या दिवशी वाद टोकाला गेला. पतीनं रागाच्या भरात पत्नीवर बांबूच्या काठीने वार केले. पतीनं केलेल्या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती असेगाव पूर्णा पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Woman Killed by Husband in Amravati
महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

पोलिसांनी विवाहित महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. तसेच आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर भोसले जोडप्याची दोन मुले पोरकी झाली असून, गावात शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Woman Killed by Husband in Amravati
नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com