Pune News: दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा! पोलीस निरीक्षक नाईक निखिल रणदिवे बेपत्ता; व्हाट्सअप स्टेट्सन् खळबळ

Police Inspector Naik Nikhil Randive Missing: दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक निखिल रणदिवे आज दुपारपासून बेपत्ता झालेत. पोलीस खात्यांतर्गत निखिलचा शोध सुरू आहे. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर नाईक रणदिवे यांनी गंभीर आरोप केलेत.
Police Inspector Naik Nikhil Randive Missing:
Yavat Police Naik Nikhil Randive missing from Daund; emotional WhatsApp status with daughter’s photo sparks concern.Saamtv
Published On
Summary
  • यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे दुपारपासून बेपत्ता.

  • मुलीचा फोटो ठेवून भावनिक व्हाट्सअप स्टेटस पोस्ट केल्याने खळबळ.

  • रणदिवेंनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

मंगेश कचरे, साम प्रतिनिधी

पोलीस निरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडलीय. व्हॉट्सअॅप स्टेट्सला मुलीचा फोटो ठेवत त्यांनी एक भावनिक पोस्ट केलीय. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडालीय. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे आज दुपारपासून बेपत्ता झालेत. यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांचा शोध घेतला जातोय. त्यांचा मोबाईल देखील बंद येतोय. निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते.

निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यातून त्यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

पोलीस निरीक्षकांची व्हाट्सअप स्टेट्स पोस्ट

माझी प्रिय दिदी

आज

तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार-पाच दिवसापूर्वी तू आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटलमध्ये घेवून जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली ०१ वर्ष पासून सतत त्रास देत आहे. माझा नाईइलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझेकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा !

यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्ष पासुन सतत त्रास देत आहेत. माझा नाई विलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे.असा गंभीर आरोप रणदिवे यांनी केला आहे. आज दुपारपासून रणदिवे यांचा मोबाईल बंद असून ते अद्याप पर्यंत मिळून आलेले नाहीत, त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडालीय.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार निखिल रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती मात्र यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांना सोडण्यात आलं नव्हतं, त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते. सध्या त्यांचं कुटुंब देखील शिक्रापूर येथे त्यांनी शिफ्ट केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com