Mumbai Pune Highway : मुंबई- पुणे महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; क्षमतेपेक्षा चारपट प्रवासी एकाच रिक्षात कोंबले; थरारक VIDEO व्हायरल

Mumbai Pune Highway Auto Viral Video : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत परिसरात रिक्षात मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
Mumbai Pune Highway : मुंबई- पुणे महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; क्षमतेपेक्षा चारपट प्रवासी एकाच रिक्षात कोंबले; थरारक VIDEO व्हायरल
Mumbai Pune newsSaam Tv
Published On
Summary
  • कामशेत परिसरात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेण्याचा प्रकार वाढला

  • वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष उघड

  • प्रवाशांच्या जीवाला सतत धोका

  • नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

दिलीप कांबळे, मावळ

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत परिसरात रिक्षा चालक प्रवाशांच्या जीवाशी सर्रास पने खेळ केला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. क्षमतेपेक्षा चार पट जास्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षा आणि अक्षरशः लटकून जीवघेणा प्रवास करणारे प्रवासी, याकडे वाहतूक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाबही उघड झाली आहे.

कामशेत परिसरात सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस कामावरून घर गाठण्यासाठी अशा पद्धतीने धोकादायक प्रवास अनेक प्रवासी करत आहेत. आरटीओच्या नियमाप्रमाणे किमान तीन प्रवासी रिक्षात बसवण्याची परवानगी असताना तब्बल बारा ते पंधरा प्रवाशांना सोबत घेऊन प्रवाशांच्या जीवाशी सर्रासपणे महामार्गावर खेळ केला जात आहे.

Mumbai Pune Highway : मुंबई- पुणे महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; क्षमतेपेक्षा चारपट प्रवासी एकाच रिक्षात कोंबले; थरारक VIDEO व्हायरल
Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

प्रवासी मागच्या दरवाजाला लटकुन जीवावर उदार होऊन प्रवास करत आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर गुन्हा, असून अशा वाहनांवर कडक कारवाई होणे अपेक्षित असताना वाहतूक पोलीस मात्र कारवाईसाठी उदासीन दिसत आहेत.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत परिसरात सातत्याने अपघात वाढत असताना प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ करणाऱ्यांवर रीक्षा चालकावर त्वरित कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान लवकरात लवकर अशा रिक्षा चालकांवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची देखील मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com