Pune Traffic : पुण्याची वाहतूक कोंडी जगात ५ व्या क्रमांकावर; ट्रॅफिकमुळं पुणेकरांचे १५२ तास वाया

Pune Traffic News : टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार पुण्याने जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीत पाचवे स्थान मिळवले आहे.
Pune Traffic : पुण्याची वाहतूक कोंडी जगात ५ व्या क्रमांकावर; ट्रॅफिकमुळं पुणेकरांचे १५२ तास वाया
Pune Traffic : पुण्याची वाहतूक कोंडी जगात ५ व्या क्रमांकावर; ट्रॅफिकमुळं पुणेकरांचे १५२ तास वायाmeta ai
Published On

पुणेरी पाट्यांना तोड नाही असं म्हणता-म्हणता पुण्याच्या ट्रॅफिकनेही सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. टॉम टॉम या संस्थेने जाहीर केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स २०२५ नुसार वाहतूक कोंडीमध्ये पुणे शहराने जगात पाचवे स्थान गाठले आहे. वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पुणेकरांचे तब्बल १५२ तास वाया गेले आहेत. यावरून पुण्याच्या वाहतूक कोंडीची समस्या किती भीषण आहे, याचा अंदाज येतो.

जाहीर झालेल्या अहवालानुसार, २०२५ मध्ये पुण्याची वाहतूक कोंडी सरासरी ७१ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. शहरातील वाहनांचा सरासरी वेग ताशी १८ किलोमीटर इतका होता. पुणेकरांना १५ मिनिटांमध्ये फक्त ४.५ किलोमीटर अंतर पार करता आलं. तसेच १० किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना सरासरी ३३ मिनिटे २० सेकंद लागतात. २०२४ मध्ये जाहीर केलेल्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार हा वेग केवळ ११ सेकंदानी वाढला आहे.

Pune Traffic : पुण्याची वाहतूक कोंडी जगात ५ व्या क्रमांकावर; ट्रॅफिकमुळं पुणेकरांचे १५२ तास वाया
घरी निघाला होता, टोळक्यानं वाटेत कार अडवली, गोळी झाडली अन्... पुण्यात प्रसिद्ध व्यवसायिकासोबत पुढे जे घडलं ते थरारक

मांडलेल्या आकडेवारीनुसार सकाळी वर्दळीच्या वेळी पुणेकरांना १० किमीचा प्रवास करायला ३८ मिनिटे १३ सेकंद लागतात; तर संध्याकाळी याच प्रवासाला ४१ मिनिटे ४० सेकंदाचा कालावधी लागत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. २०२५ मधला ऑगस्ट हा सर्वाधिक वाहतूक कोंडीचा महिना ठरला. या महिन्यात वाहतूक कोंडीच्या समस्येने परिसीमा गाठली होती. वाहतूक कोंडीची पातळी ७९ टक्क्यांपर्यंत पोहोचली. तसेच पुन्हा १६ ऑक्टोबर हा देखील पु्ण्यासाठी सर्वाधिक वाहतूक कोंडीचा दिवस ठरला. त्या दिवशी केवळ २.७ किमी अंतर कापण्यासाठी पुणेकरांना १५ मिनिटे वेळ लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Pune Traffic : पुण्याची वाहतूक कोंडी जगात ५ व्या क्रमांकावर; ट्रॅफिकमुळं पुणेकरांचे १५२ तास वाया
Home Accident: शेल्फ फुटला अन् काचेचा तुकडा पायात घुसला, चालण्याची शक्यताच संपली होती, पण...! डॉक्टरांनी वाचवला तरूणाचा पाय

दरम्यान सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मेक्सिको सिटी आहे. त्यानंतर भारतातील बंगळूरू, आयर्लंडमधील डब्लिन, पोलंडमधील लॉड्झ आणि आता पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्रातील पुणे शहर आहे. या अहवालामुळे पुण्यातील वाढत्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान समोर उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि अनियमित वाहतूक नियोजन हे मुद्दे पुन्हा अधोरेखित झाले आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com