सचिन जाधव, साम टीव्ही
पुण्यातील वाघोली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावडेवाडी-शिरसवडी रस्त्यावर व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवडी, ता. हवेली) हे काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कारमधून घरी जात होते. यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या कारला अडवत त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गावडे यांच्या जबड्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोळीबारानंतर आरोपींनी जखमी अवस्थेत असलेल्या गावडे यांच्या अंगावरील सुमारे २२ तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे, जबरदस्तीने हिसकावून घेतले. मात्र त्यांच्या हातातील सुमारे १० तोळ्यांचे सोन्याचे कडे आरोपींना काढता आले नाहीत. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेदरम्यान वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींपैकी एक दुचाकी चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.