Pune news : पुण्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, वाचा

pune Police News : ऑपरेशन सिंदूरनंतर पुण्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
pune News
pune Police News Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने मुंबईपाठोपाठ पुण्यात अलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर पुण्यात दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे. पुणे पोलिसांनी शहरात ड्रोन, पॅराग्लायडिंग, एअरक्राफ्ट, हॉट एअर बलूनला बंदी घातली आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून मोठी खबरदारी ठेवण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅन्डग्लायडर, हॉटएअर, हॉटएअर बलूनच्या उड्डाणास पोलिस प्रशासनाने बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील तीस दिवस म्हणजेच १२ जूनपर्यंत ही बंदी असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

pune News
bjp minister controversy : भाजप सरकारचा बडा नेता गोत्यात; कर्नल सोफिया कुरैशींवरील वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल

मुंबईतही हायअलर्ट

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर अलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानने जम्मू, राजस्थान, पंजाब या भागात हल्ले केले आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान काही ब्लॅकआउट देखील करण्यात आले होते. ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलं.

pune News
Shocking News : हेअर ट्रान्सप्लांट करताना आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू; त्याच डॉक्टर तरुणीकडून भयंकर उपचार

भारताने लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यामुळे मुंबईवरही हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात असून धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर हायअलर्ट आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com