India-China : ऑपरेशन सिंदूरवर चिवचिव भोवली! भारतानं थेट चीनवर केला डिजिटल स्ट्राइक

India's digital strike on China: पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत अपप्रचार करणं चीनला भोवलं आहे. पाकिस्ताननंतर भारतानं थेट चीनवरच डिजिटल स्ट्राइक केला आहे. चीनचा सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआच्या एक्स हँडलवर बंदी घातली आहे.
India's digital strike on China
India's digital strike on Chinasaam tv
Published On

पाकिस्तानविरोधात संघर्ष चिघळला असताना भारताच्या विरुद्ध चिवचिवाट करणाऱ्या चीनला जोरदार दणका दिला आहे. भारतानं चीनवर डिजिटल स्ट्राइक केला आहे. सरकारने बुधवारी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआच्या एक्स हँडलवर भारतात बंदी घातली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरबाबत अपप्रचार केल्यामुळं ही कठोर कारवाई केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला होता. त्यावेळी याच सोशल मीडिया अकाउंटवरून भारतीय लष्कराबाबत खोटे आणि तथ्यहीन दावे केले होते. त्यामुळे ही बंदी घातली आहे. चीनच्या या सरकारी वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या हँडलवरून सातत्याने दुष्प्रचार करण्यात येत होता. त्यावर भारतीय दूतावासाकडून कडक शब्दांत समज दिली होती.

कोणत्याही प्रकारची संभ्रम पसरवणारी पोस्ट शेअर करण्याआधी त्यातील तथ्ये तपासून बघावेत आणि स्त्रोतांची खात्री करावी, असं बीजिंगस्थित भारतीय दूतावासानं ग्लोबल टाइम्स न्यूजला सांगितलं होतं.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चिघळला होता. भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. त्यानंतर चीनच्या मीडियानं त्यात नाक खुपसलं होतं. काही पाकिस्तानी मीडिया आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून खोटे दावे करण्यात आले होते. भारतीय हवाई दलाचे एक राफेल विमान बहावलपूरजवळ पाडण्यात आल्याची खोटी माहिती त्यांनी पसरवली होती. हे खोटे दावे पसरवणे आणि प्रसिद्ध करण्याचा आरोप ग्लोबल टाइम्सवर होता, असं सांगण्यात येत आहे.

पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने या दाव्यांचे खंडन केले होते. व्हायरल होणारे फोटो चुकीचे आणि जुने असल्याचे या टीमकडून स्पष्ट करण्यात आले होते. हे फोटो २०२१ मध्ये पंजाबच्या मोगा जिल्ह्यात मिग-२१ दुर्घटनेचे होते. त्याचा सध्याच्या ऑपरेशन सिंदूरशी काहीही संबंध नाही, असे सांगण्यात आले होते.

India's digital strike on China
India Pakistan Tension: रशियाची एस-400 भारतीय हवाई दलात सामील होणार; पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली|VIDEO

अरुणाचल प्रदेशच्या मुद्यावर चीनला फटकारले

डिजिटल स्ट्राइकनंतर चीनला अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर भारतानं चांगलेच फटकारले. आज, बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याच्या प्रयत्नावरही तीव्र आक्षेप नोंदवला. चीनचे हे नामकरण प्रयत्न व्यर्थ आहेत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि यापुढेही राहील, असं बजावलं.

India's digital strike on China
India-Pakistan Ceasefire: बॉर्डरवर पाकिस्तानशी लढताना BSF जवानाला वीरमरण, ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न; गावावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com