Pune : काळजाचा थरकाप! पुण्यात २४ तासांत ८ जणांचा संशयास्पद मृत्यू; दोन सख्ख्या भावांचाही समावेश

Pune Fugewadi suspicious deaths : पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात २४ तासांत ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विषारी गावठी दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिस तपास सुरू आहे.
Pune Fugewadi suspicious deaths :
Pune Fugewadi suspicious deaths :
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

8 people died suspiciously in Pune : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव आणि फुगेवाडी परिसरावर गेल्या दोन दिवसांपासून जणू मृत्यूचे सावट पसरले आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या दुर्दैवी घटनांच्या सत्रामुळे अवघ्या काही तासांत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. २ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. एकापाठोपाठ झालेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून नागरिकांमध्ये कमालीचा धक्का आणि भीतीचे वातावरण आहे.

सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासन या मृत्यूंमागच्या कारणांचा शोध घेत असून, परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सामूहिक मृत्यूंमागे अवैध आणि बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी दारू) कारणीभूत असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मृतांची नावे-

१) पाडुरंग फुगे

२) विजय प्रकाश राठोड

३) राजेंद्र प्रकाश राठोड

४) राजू रजपुत

५) अकबर पठाण

६) बाबा शेख

७) आनंद देसाई

८) आनंद निकाळजे

या दोघांची प्रकृती चिंताजनक

१) सुभाष डिगीकर - मेडी पाॅईट हॉस्पिटल

२) अक्षय अवसरमल - यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल

Pune Fugewadi suspicious deaths :
Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

फुगेवाडी परिसरातील आनंदवन, काटे वस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या भागांतील घराघरांतून सध्या केवळ आक्रोश आणि हंबरडे ऐकू येत आहेत. कालपर्यंत आपल्यात हसणाऱ्या-वावरणाऱ्या व्यक्ती अचानक डोळ्यांदेखत निघून गेल्याने स्थानिक रहिवाशांना या धक्क्यातून सावरणे कठीण झाले आहे. या अकल्पित घटनांमुळे अनेक हसतीखेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

Pune Fugewadi suspicious deaths :
Pune : पिंपरीत ६ जणांच्या संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सांगितली महत्त्वाची माहिती

या संपूर्ण दुर्घटनेत फुगेवाडी येथील राठोड कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर सर्वात मोठा आणि मन सुन्न करणारा आहे. विजय राठोड (वय ३१) आणि राजेंद्र राठोड (वय ३४) या दोन सख्ख्या भावांना काळाने एकाच वेळी कवेत घेतले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या दोन्ही तरुण मुलांना एकाच वेळी गमावल्याने त्यांच्या वृद्ध आईचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा आहे. या दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Pune Fugewadi suspicious deaths :
Pune : लग्नासाठी भररस्त्यात तरुणाचे अपहरण; तरुणीसह ७ जणांना बीडमधून अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com