

पुण्याच्या फुगेवाडी सहा जणांचं संशयास्पद मृत्यू प्रकरण
प्राथमिक माहिती विषारी दारू प्राशन केल्याचं काही संबंध नसल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितलं
सहा जणांच्या मृत्यूने पिंपरीत खळबळ
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये काल आणि आज सहा जणांचा संशयासपदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ६ जणांच्या संशयास्पद मृत्यूने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विषारी दारू प्यायल्याने काही जणांचा मृत्यू झाला, अशी चर्चा फुगेवाडी परिसरात जोर धरू लागली आहे.
पाच पैकी चार जणांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा आणि एकाचा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाला असावा, अशी प्राथमिक माहिती दापोडी पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
मृतामध्ये अकबर पठाण या व्यक्तीला मागील 15-16 वर्षापासून दारू पिण्याचे व्यसन असून काल रात्री त्याला चक्कर आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याचं आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती त्यांचे नातेवाईकानी दिली आहे.
एकाच घरातील विजय प्रकाश राठोड आणि राजू प्रकाश राठोड या दोन भावांचा देखील संशयास्पद रित्या मृत्यू झाला आहे. मात्र विजू प्रकाश राठोड याला तो काम करत असलेल्या कंपनीत चक्कर आल्याने खडकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याच पुढील उपचारादरम्यान मृत्यू झालं आहे.
विजू राठोडच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर त्याचा भाऊ राजू प्रकाश राठोड याला देखील फिट आल्याने त्याला औंध हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा देखील मृत्यू झाला आहे. विजू राठोड आणि राजू राठोड यांना दारूचे व्यसन नव्हतं, अशी माहिती त्याचे वडील प्रकाश राठोड यांनी पोलिसांना दिली आहे.
तर राजेश शांताराम राजपूत आणि आनंद देसाई यांना देखील चक्कर आल्याने त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांचं मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झालं असावं त्यांनी दारू प्राशन केलं नव्हतं अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
पांडुरंग फुगे या व्यक्तीचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असावा. त्यांनी देखील दारू प्राशन केल्याचं अजून कोणतीही माहिती समोर आली नाही, अशी माहिती दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.