सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune kidnapping case : भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावरून एका तरुणाचे बळजबरीने अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना पुण्यात समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे अपहरण केवळ लग्नासाठी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत, अपहरण करणाऱ्या तरुणीसह तिच्या ७ साथीदारांना बीडमधून अटक केली आहे. या घटनेने पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एका २७ वर्षीय तरुणीने तरुणाशी बळजबरीने लग्न करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने त्याचे भररस्त्यातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ घडली. लोणीकंद पोलिस आणि गुन्हे शाखेने बीड पोलिसांच्या मदतीने माजलगाव येथून तरुणीसह सात आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली आहे.
सुदाम माणिक ताठे (वय २३), शेख सोहेल शेख अफसर (वय २१), देविदास भगवान पांजगे (वय २१), वैभव मिलिंद शेळके (वय २२), प्रसाद बंडू गवळी (वय २७, सर्व रा. परभणी), मोटार चालक सारंग भगवानराव काकडे (वय ३३, रा. नांदेड) आणि एक तरुणी (वय २७, रा. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या संदर्भात अजय लक्ष्मण बोद्रे (रा. शिंदेवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाने सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. लोणीकंद परिसरात २७ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ नीलेश लक्ष्मण बोद्रे (वय २९, रा. शिंदेवाडी) याला काहीजणांनी मारहाण करून मोटारीतून पळवून नेले. गुन्हे शाखेसह लोणीकंद पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली. यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.