Ladki Bahin Yojana May Installment Update: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मे महिन्यातच राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकत्रित जमा झाले आहेत. मात्र, आता मे महिन्याचे १५०० रुपये कधी जमा होणार? याकडे पात्र महिलांच्या नजरा खिळल्या आहेत.
अवघ्या ४ दिवसांत मे महिना संपणार आहे, परंतु अद्याप लाडक्या बहिणींच्या या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील महिलांना हा हप्ता कधी मिळणार? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या १० ते १५ तारखेदरम्यान पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा करते; त्याबाबतचा शासन निर्णय (GR) आधीच काढण्यात आला होता. त्यानुसार, जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळेल, अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारकडून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हा निधी मंजूर करून वर्ग केला जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होणार आहेत. मे महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. दुसरीकडे, जवळपास ७० लाख अपात्र महिलांच्या खात्यात हे १५०० रुपये येणार नाहीत. ३० एप्रिलपर्यंत 'ई-केवायसी' (e-KYC) न झाल्यामुळे राज्यातील जवळपास ७० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. काही महिलांनी ई-केवायसी केलीच नाही, तर काही महिला नियमांत न बसल्यामुळे अपात्र ठरल्या. परिणामी, या सर्व महिलांचा मासिक लाभ बंद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.