पुण्यात मध्यरात्री भीषण अपघाताचा थरार; भरधाव कार १७० ते २०० फूट खोल दरीत कोसळली

pune accident : पुण्यात मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. ही भरधाव कार १७० ते २०० फूट खोल दरीत कोसळली.
pune news update
pune newsSaam tv
Published On

पुण्यातील राजगड तालुक्यात मध्यरात्री भीषण अपघात

भरधाव कार १७० ते २०० फूट खोल दरीत कोसळली

कारमधील दोन जण गंभीर जखमी

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. राजगड तालुक्यातील पाबे घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार सुमारे १७० ते २०० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

राजगडमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास घाट चढत असताना एका तीव्र वळणावर, चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार थेट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शुभम सचिन अजेटराव आणि अमित सचिन अजेटराव अशी जखमी असलेल्या दोघांची नाव आहेत.

pune news update
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

शुभम सचिन अजेटराव आणि अमित सचिन अजेटराव हे कारने रात्री उशिरा वेल्हेहून पाबे खिंडी मार्गे पुण्याकडे निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास घाट चढत असताना एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार थेट खोल दरीत कोसळून हा अपघात झालाय.

अपघाताची माहिती मिळताच वेल्हे पोलिस ठाण्याचे कर्मचारी आकाश पाटील यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवलं. त्यानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केलं. दरीत अडकलेल्या जखमींना मोठ्या प्रयत्नांनी स्ट्रेचरच्या साह्याने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

pune news update
Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

दरीत कार कोसळल्याने कारचे मोठं नुकसान झालं आहे. कारचा चेंदामेंदा झाला आहे. मध्य रात्री ही कार एका झाडाला धडकली. एकाच जागेवर थांबली. त्यामुळे कारमधील लोकांचा वाचला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com