

सचिन जाधव
भाजप महाराष्ट्रने काल देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या कवितेचा व्हिडिओ 'एक्स' अकाऊंटवरून पोस्ट केला होता. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या व्हिडिओनंतर भाजप नेत्यांनी केवळ कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, या दृष्टीने व्हिडिओ पोस्ट केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता पुण्यात 'भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवार' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे राज्याच्या राजकारणातील चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या व्हिडिओनंतर आता अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. पुण्यात अजित पवार यांचे 'भावी मुख्यमंत्री' असे बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यात अजित पवार गटाच्या राहुल पायगुडे या कार्यकर्त्याने बॅनर लावले आहेत.
पुण्यात राहुल पायगुडे यांनी अजित पवार यांचं बॅनर लावलं आहे. या बॅनरवर 'विकासाचा वादा अजितदादा' असं लिहिलंय. त्याचबरोबर 'होय म्हणूनच भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवार' असंही बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
भाजप महाराष्ट्रच्या 'एक्स'वरील 'मी पुन्हा येईन' या व्हिडिओ पोस्टनंतर अजित पवार यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
धर्मराव बाबा आत्राम यांचं मोठं वक्तव्य
तत्पूर्वी, आजच राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अजित पवारांवरील वक्तव्यानंतर राजकारण ढवळून निघालंय. 'अजितदादा मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं. धर्मराव बाबा आत्राम यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.