Beed Political News: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; माजी मंत्र्याची कार फोडली

Beed Political News: ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची चारचाकी फोडल्याची घटना घडली आहे. बीडच्या मादळमोही गावात ही घटना घडली आहे.
Beed Political News
Beed Political NewsSaam tv

Beed Political News:

मराठा आरक्षणावरून आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची चारचाकी फोडल्याची घटना घडली आहे. बीडच्या मादळमोही गावात ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातील बहुतांश गावात घेरलं जात आहेत. मराठा आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Political News
Shinde Group MLA Statement : CM शिंदेंमुळं शिवसेना-भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

या तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची कार मराठा आंदोलकांनी फोडल्याची घटना घडली आहे.

बीडच्या मादळमोही गावात बदामराव पंडित आले होते . त्यावेळी मराठा आंदोलकांनी गाडीवर दगडफेक करत गाडी फोडली. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर राजकीय नेते आणि मराठा पुढारी असल्याचं दिसून येत आहे.

Beed Political News
Breaking Maharashtra Politics: मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्यास ठाकरे जबाबदार; शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा गंभीर आरोप

आंदोलकांनी अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले

नांदेड जिल्हयातील माहुर येथे आज मराठा आंदोलकानी काँगेस नेते अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्याने वाढदिवस साजरा करणार नाही, असं अशोक चव्हाण यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं.

आज अशोक चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी त्यांच्या समर्थकानी बॅनर लावले. माहूर शहरात बॅनर लागल्याने सकल मराठा समाजाकडून बॅनर फाडून अशोक चव्हाण यांचा निषेध करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com