Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं?

Nasrapur Case update: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली. आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं?
NASRAPUR CHILD RAPE AND MURDER CASESaam Tv
Published On
  • नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडे

  • आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

  • न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आज न्यायालयाने अंतिम सुनावणी करत निकाल दिला. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. आरोपी फाशीच्या शिक्षाला पात्र आहे. हा आरोपी समाजासाठी घातक आहे. त्याचे समाजात राहणं धोकादायक असल्याचे सांगत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत...

आरोपी भीमराव कांबळेला आज साडेदहाच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे सत्र न्यायालयात स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एम आर साळुंके यांच्या समोर ही सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अजय मेसर उपस्थितीत होते. १३७ पाने जेजमेंट आहे त्यातील फक्त महत्वाचा पार्ट वाचला गेला. दोन्ही बाजू ऐकण्यात आल्या. विशेष सरकारी वकील अजय मेसर यांनी १२ केस संदर्भ दिला. या सर्व केसमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आजवरच्या चिमुकलींवर अत्याचार झालेल्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा झाल्याचे न्यायालयाकडून आवर्जून उल्लेख केला गेला. न्यायालयात संदर्भ दिलेल्या प्रकरणाच्या शिक्षा काय होत्या गुन्हे काय होतेते वाचले गेले. ही केस दुर्मिळातील दुर्मिळ आहे, असं आम्हाला वाटतं, असे न्यायाधीशांनी सांगितले.

Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सांगितले की, 'दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अंतिम निकाल तयार केला आहे. सर्व सात गुन्हे आरोपीचे सिद्ध झाले आहेत. देशातील यापूर्वीच्या खटल्यातील निकालांचा आधार घेतला आहे. बलात्कार आणि अमानुष खून केल्याप्रकरणी यापूर्वी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. आरोपीने हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने प्लँन करून केला आहे हे तपासात सिद्ध झालं आहे.'

Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय

न्यायाधीशांनी असे देखील सांगितले की, 'घटना किती क्रूर आहे. घटनेत मुलीला किती निर्घृणपणे मारण्यात आलं आहे याचा समाजावर कसा परिणाम झाला आहे हे पण विचारात घेतले गेले. काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करताना दोन घटनांचा दाखला दिला आहे. या आधीच्या घटनेत मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. ४२ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या १२ केसचा दाखला सरकारी वकिलांनी दिला आहे. ज्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.'

Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nasrapur case : नसरापूर अत्याचारात नराधम दोषी, 29 जूनला भीमराव कांबळेला फाशी? कोर्टात नेमकं काय घडलं?

न्यायाधीशांनी पोलिस, डॉक्टर आणि तपास पथकाचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, 'ही दुर्मिळ केस आहे. गुन्हा हा सिरियस आहे. चिमुकलींना क्रूरपणे मारले. या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यात सीसीटीव्ही पुरावा पीएम रिपोर्ट गुन्ह्याची तीव्रता दाखवतो. आरोपीची पूर्वीचे गुन्ह्याची दखल घेतली. समाजात किळस आणणारे कृत्य आरोपीने केले आहे. आरोपी समाजासाठी कलंक आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत वेळ देऊन सुनावणी करण्यात आली. तपास यंत्रणेने तत्परता दाखवली. डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट यांनी चांगले काम केले. या केसमध्ये अनेक पुरावे उपयोगी पडले.'

तसंच, या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वाचे निरिक्षण दिले, 'जर समजा आरोपी हा तरूण किंवा मग वयोवृद्ध असला असता तर कदाचीत त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विचार झालाही असता पण या केसमध्ये तसं एकही कारण समोर दिसत नाही. आरोपीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही.'

Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nasarapur Case: कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा, नसरापूर प्रकरणातील आरोपीचा हादरवून टाकणारा चेहरा समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com