Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

Nasarapur Case Verdict Tomorrow: भोरच्या नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालय आरोपी भिमराव कांबळेला काय शिक्षा सुनावतेय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, न्यायलय आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणार
NASRAPUR CHILD RAPE AND MURDER CASESaam tv
Published On
  • नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण

  • आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवलं

  • अंतिम शिक्षा २९ जून रोजी न्यायालयाकडून सुनावली जाणार आहे

  • आरोपीला फाशी किंवा जन्मठेप होतेय याकडे राज्याचे लक्ष लागले

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल २९ जून म्हणजे सोमवारी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर साळुंके यांनी आरोपीला दोषी ठरवत या प्रकरणाचा निकाल रोखून ठेवला होता. सोमवारी यावर अंतिम सुनावणी होणार आहे. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होते की जन्मठेपेची शिक्षा होते? हे पाहणं महत्वाचे राहिल.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजल्यानंतर नसरापूर प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने २ दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपी भिमराव कांबळेला दोषी ठरवलं. आता उद्या नेमका काय निकाल लागतोय हे चित्र स्पष्ट होईल. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशी होणार का जन्मठेप? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिला खटला आहे.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, न्यायलय आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणार
Nasrapur case : नसरापूर अत्याचारात नराधम दोषी, 29 जूनला भीमराव कांबळेला फाशी? कोर्टात नेमकं काय घडलं?

राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे होत आहे की, ५८ दिवसांत प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करत अवघ्या १५ दिवसांच्या आत १, २०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ५५ पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, न्यायलय आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणार
Nasarapur Case: कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा, नसरापूर प्रकरणातील आरोपीचा हादरवून टाकणारा चेहरा समोर

भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी ही घटना घडली होती. ३ वर्षांच्या चिमुकलीवर भिमराव कांबळे या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. चिमुकलीला वासरू दाखवतो सांगत आरोपी तिला गोठ्यात घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. चिमुकली आजोळी आजीकडे गेली असता ही घटना घडली होती. आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली होती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुण्यात रास्तारोको करत पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता. संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले.

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, न्यायलय आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणार
Nasarapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही, पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com