

पुणे महानगर पालिकेने २०२६-२७ साठी १३,९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले
वाहतूक सुधारण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, पूलांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली
पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवरही भर
मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग, नवीन पूल आणि शहर विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार
पुणे महागनर पालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आज हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन रस्ते, पूल, उड्डाणपूल तसंच पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोट्यवधींची तरतूद या अंदाजपत्रामध्ये करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेकडून अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.
पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर पे अँड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील तीन पुलांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शास्त्रीनगर उड्डाणपूल, बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल, सेनापती बापट चौक उड्डाणपूल येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे.
पुढील वर्षामध्ये मुंढवा चौकातील उड्डाणपूल, शिवणे नांदेड सिटी नदीवरील पूल, चांदणी चौक ते भुगाव उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरण प्रकल्प, साखर संकुल रेल्वे उड्डाणपूल, खडकी येथील रेल्वे मुयारी मार्ग या प्रकल्पचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पसोबत कोथरूड बसडेपो चौक, आंबेडकर चौक (वारजे) चौक, दांडेकर पूल चौक या ठिकाणी मेट्रोसोबतच उड्डाणपुलाचे एकत्रित नियोजन आहे. मेट्रो स्टेशनजवळ नागरिकांना पार्किंग व्यवस्था करण्यासाठी सुमारे ३० ठिकाणी ॲमिनिटी स्पेस उपलब्ध करून पार्किंग मिळणार आहे. पुणे शहराचे विकास आराखड्यातील चार बोगद्यांपैकी पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) आणि हिंगणे (खुर्द) ते तळजाई चौक या दोन बोगद्यांचा विचार करण्यात आला आहे.
१) पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद
२) पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद
३) मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन साठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद
४) प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद
५) भवन रचना विभासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद,
६) विद्युत विभाल २६५ कोटी रुपयांची तरतूद
७) समाज विकासाला १४३.५० कोटी रुपयांची तरतूद
८) उद्यान विभागाला २०५ कोटी रुपयांची तरतूद
९) आरोग्य विभागासाठी ८८ कोटी रुपयांची तरतूद
१०) नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपयांची तरतूद
११) पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपयांची तरतूद
१२) माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी रुपयांची तरतूद
१३) हेरिटेज सेलसाठी २८.५० कोटी रुपयांची तरतूद
१४) पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद
१५) पुणे शहरातील वाहतूक नियोजन व प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.