

पुणे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. पुण्यातील मेट्रोला २ ला मंजुरी मिळाली असून आता मेट्रो हडपसर-लोणी, सासवड व वाघोलीपर्यंत मेट्रो धावणार आहे. मेट्रो टप्पा-2 मध्ये खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिकाची लांबी 16 किलोमीटर आहे. त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहेत. या दोन्ही उपमार्गिका उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रोच्या झालेल्या या विस्तारीकरणाबाबत पुणेकर आणि सासवडकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शासनाने अर्थसंकल्पात मेट्रो विस्ताराला सासवडपर्यंत मंजुरी दिल्यामुळे सासवडकर नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
शहराच्या पूर्व परिसरासह ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्यात येणार आहे.त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटेग्रेशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. हडपसर बस डेपो ते सासवड रोडपर्यंत राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याने मेट्रोचे जाळे वाढणार आहे.
सासवडकरांची आणि पुणेकरांचीही थेट कनेक्टिव्हिटी वाढल्याने व्यापार, उद्योग क्षेत्रात वाढेल. हा भाग आणखी मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार करण्यात आलाय. यात रामवाडी ते वाघोली असा ११ कि.मी. लांबीच्या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे अहिल्यानगर मार्गावरील रामवाडीपासून आता ही मेट्रो वाघोलीपर्यंत जाणार आहे. या नव्या मागार्मुळे नगर रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.