Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, सियाच्या भावाच्या अडचणीत वाढ; नेमकं काय घडलं?

Pune Lohagad Fort Ketan Murder Case Update : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नवे वळण आले असून अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलला १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
KETAN AGRAWAL MURDER CASE: ADVOCATE ASHUTOSH SRIVASTAVA SENDS ₹10 CRORE LEGAL NOTICE TO SAHIL GOYAL
KETAN AGRAWAL MURDER CASE: ADVOCATE ASHUTOSH SRIVASTAVA SENDS ₹10 CRORE LEGAL NOTICE TO SAHIL GOYALSaam Tv
Published On
Summary
  • केतन अग्रवाल हत्याप्रकरणात साहिल गोयलला १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस

  • अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी बदनामीचा दावा

  • सिया गोयलच्या न्यायालयीन विधानानंतर प्रकरणाला नवे वळण

दिलीप कांबळे, मावळ

केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी तब्बल १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. साहिल गोयल यांनी केलेल्या कथित आरोपांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला गंभीर धक्का बसल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सिया गोयलने न्यायालयासमोर एक महत्त्वाचे विधान केले. “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून अॅडव्होकेट विपुल दुशिंग आहेत,” असे तिने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. या वक्तव्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, याच पार्श्वभूमीवर आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलविरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे.

KETAN AGRAWAL MURDER CASE: ADVOCATE ASHUTOSH SRIVASTAVA SENDS ₹10 CRORE LEGAL NOTICE TO SAHIL GOYAL
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, साहिल गोयल यांनी त्यांच्याविरोधात खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केले. या आरोपांमुळे त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीवर तसेच सामाजिक प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. वकिली व्यवसायात विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांमुळे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कायदेशीर नोटिशीत साहिल गोयल यांनी केलेले सर्व आरोप तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिकरीत्या माफी मागणे, भविष्यात अशा प्रकारचे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देणे आणि झालेल्या मानसिक, सामाजिक व व्यावसायिक नुकसानीपोटी १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे, अशा मागण्यांचाही समावेश आहे.

KETAN AGRAWAL MURDER CASE: ADVOCATE ASHUTOSH SRIVASTAVA SENDS ₹10 CRORE LEGAL NOTICE TO SAHIL GOYAL
Milk : तुमच्या दुधातही भेसळ आहे? 'या' ५ सोप्या पद्धतीने घरच्या घरी तपासा

दरम्यान, या नोटिशीनंतर प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली असून, साहिल गोयल यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते या नोटिशीला कायदेशीर उत्तर देणार की आरोपांबाबत स्पष्टीकरण सादर करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com