वॉशरूमबाहेर तरुणीसोबत नको ते कृत्य, मदत करण्याऐवजी पळून जाण्यासाठी मॅनेजरची आरोपीला मदत; नंतर... पुण्यात काय घडलं?

Pune Koregaon Park Pub Washroom Harassment Incident News: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Shocking incident reported at a Koregaon Park pub in Pune where a woman was allegedly harassed near the washroom area.
Shocking incident reported at a Koregaon Park pub in Pune where a woman was allegedly harassed near the washroom area.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यातील हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील एका पबमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी पबमधील एका ग्राहकासह आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Shocking incident reported at a Koregaon Park pub in Pune where a woman was allegedly harassed near the washroom area.
मोठी बातमी! कैसे हराया फेम सहर शेखचे नगरसेवक पद जाणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार 24 वर्षीय तरुणी 11 एप्रिल रोजी कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स पबमध्ये गेली होती. मध्यरात्री दोन सव्वादोनच्या सुमारास ती वॉशरूमबाहेर उभी असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करत अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने जोरजोरात आरडाओरडा केला.

Shocking incident reported at a Koregaon Park pub in Pune where a woman was allegedly harassed near the washroom area.
Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर पबमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, यावेळी पीडितेची मदत करण्याऐवजी पबच्या व्यवस्थापकाने संबंधित संशयित आरोपीला तिथून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या व्यक्तीसोबतच पब व्यवस्थापकावरही गुन्हा नोंदवला आहे.

Shocking incident reported at a Koregaon Park pub in Pune where a woman was allegedly harassed near the washroom area.
Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोरेगाव पार्क पोलिस सध्या पबमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. पुण्यातील पब आणि पब संस्कृतीवरून आधीच वाद सुरू असताना, या ताज्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com