Pune : केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणातील धक्कादायक बाब उघड; गर्भलिंग निदानासाठी जनावरांच्या मशीनचा वापर

Pune News : केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात महिलांच्या गर्भलिंग तपासणीसाठी जनावरांच्या सोनोग्राफी मशीनचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी नरेंद्र ठाकरे याला बेड्या.
KEDGAON FOETUS SEX DETERMINATION CASE: PORTABLE VETERINARY ULTRASOUND MACHINE USED FOR ILLEGAL GENDER TESTING
KEDGAON FOETUS SEX DETERMINATION CASE: PORTABLE VETERINARY ULTRASOUND MACHINE USED FOR ILLEGAL GENDER TESTINGSaam Tv
Published On
Summary
  • केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासात धक्कादायक सत्य

  • जनावरांच्या सोनोग्राफी मशीनचा वापर झाल्याचा खुलासा

  • मुख्य आरोपी नरेंद्र ठाकरे याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले

  • अण्णासाहेब गिरी, नरेंद्र ठाकरे आणि डॉ. अतुल जाधव यांना अटक

सागर आव्हाड, पुणे

केडगाव येथील गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलांच्या बेकायदा गर्भलिंग निदानासाठी जनावरांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नरेंद्र साहेबराव ठाकरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले असून तपासाला वेग आला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकताच पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या रॅकेटच्या माध्यमातून गावोगावी जाऊन महिलांची बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कायद्याने गर्भलिंग निदानास बंदी असतानाही हे रॅकेट अत्यंत गुप्तपणे कार्यरत होते. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून महिलांच्या गर्भलिंग तपासणीसाठी पशुवैद्यकीय सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर केला जात होता. या मशीनचा पुरवठा नरेंद्र ठाकरे याच्याकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

KEDGAON FOETUS SEX DETERMINATION CASE: PORTABLE VETERINARY ULTRASOUND MACHINE USED FOR ILLEGAL GENDER TESTING
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार प्रवेश

या प्रकरणात यापूर्वी अण्णासाहेब गिरी, नरेंद्र साहेबराव ठाकरे आणि डॉक्टर अतुल अंकुश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या आरोपींची चौकशी सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

KEDGAON FOETUS SEX DETERMINATION CASE: PORTABLE VETERINARY ULTRASOUND MACHINE USED FOR ILLEGAL GENDER TESTING
Monsoon Upate : मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून

मुलींच्या जन्मदरावर परिणाम करणाऱ्या अशा बेकायदा कृत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांचा शोध घेऊन संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. दरम्यान, या प्रकरणातून गर्भलिंग निदानाविरोधातील कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com