पुण्यात रिलस्टार की गँगस्टर? रिलस्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक

Reel Star Madhavi Kumbhar Arrested : डेक्कन जिमखाना परिसरातील कॅफे फ्लाईंग जिप्सीमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी रिलस्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
PUNE CRIME REEL STAR MADHAVI KUMBHAR AMONG 7 ARRESTED IN INFLUENCER ATTACK CASE

Meta Description
PUNE CRIME REEL STAR MADHAVI KUMBHAR AMONG 7 ARRESTED IN INFLUENCER ATTACK CASE Meta Description
Published On

पुण्यात गँग वॉर काही नवं नाही. कोयता गँगगही तुम्ही पाहिली...मात्र आता पुण्यातले रिलस्टारच गँगस्टर झाले आहेत. कारण या गुन्हेगारीचे लोण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार्सपर्यंत पोहोचलंय. पुण्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डेक्कन जिमखाना परिसरातील 'कॅफे फ्लाईंग जिप्सी'मध्ये 19 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप यांच्यावर एका गटानं कोयत्यानं हल्ला केला.ज्या प्रकरणात आता रिलस्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक करण्यात आलीय.मात्र रिलस्टारमधील या वादामागे नेमकं काय कारण आहे? पाहूयात

PUNE CRIME REEL STAR MADHAVI KUMBHAR AMONG 7 ARRESTED IN INFLUENCER ATTACK CASE

Meta Description
Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; मारहाणीत पत्नीनं सोडला जीव, घाबरून पतीनंही मृत्यूला कवटाळलं

पुण्यात रिलस्टार की गँगस्टर?

माधवी कुंभार आणि अथर्व जगताप हे दोघेही सोशल मीडिया रिलस्टार असून एकमेंकाच्या परिचयाचे आहेत.काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यातील एका गटात माधवी कुंभार तर दुसऱ्या गटात अथर्व जगताप होता.

PUNE CRIME REEL STAR MADHAVI KUMBHAR AMONG 7 ARRESTED IN INFLUENCER ATTACK CASE

Meta Description
जंतर-मंतरनंतर विद्यार्थ्यांचा दुसरा मोठा विजय! CGL आणि TDPL द्वारे घेतलेल्या सर्व परीक्षा रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा

त्यामुळे जुन्या वादाचा राग आणि मनात खदखदत असल्यामुळे माधवीनं साथीदारांसह डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाईंग जिप्सी अथर्व जगताप दिसताच "तू पोरींना काय बोलला, आमच्यासोबत चल, तुला दाखवते" असं म्हणत अथर्वला शिविगाळ केली. तसंच अथर्वच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आल्याचीही माहिती समोर आलीय.

'इन्स्टा'च्या कमेंट अन् लाईकवरुनही अथर्व आणि माधवी कुंभारमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे...त्यामुळे पुण्यासारख्या शिक्षण व विद्येच्या माहेरघरात सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा गैरवापर करत तरुणाई अशा हिंसक मार्गावर जात असेल. तर पुणे पोलीस नेमकं काय करतायत?

रील स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर जर गँगवॉर करू लागले तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? आधी पुण्यातील गुन्हेगारांनी पोलीसांना हैराण केलेलं असताना दुसरीकडे रिलस्टारच गँगस्टर झाल्यानं पुण्यातली गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढचतच चाललीय. त्यामुळे पुणे पोलिसांचा खुळखुळा झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com