Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; मारहाणीत पत्नीनं सोडला जीव, घाबरून पतीनंही मृत्यूला कवटाळलं

Bangalore Crime News : कौटुंबिक वाद आणि रागाच्या भरात हातून घडलेल्या एका चुकीमुळं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त झाल्याची घटना बेंगळुरूत घडलीय. पतीनं केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. तर भीतीमुळं त्यानं स्वतःही आयुष्य संपवलं.
Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; पतीच्या मारहाणीमुळं पत्नीनं सोडला जीव, नंतर स्वतःनंही मृत्यूला कवटाळलं
Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; पतीच्या मारहाणीमुळं पत्नीनं सोडला जीव, नंतर स्वतःनंही मृत्यूला कवटाळलंsaam tv
Published On

नवरा-बायकोचा संसार म्हणजे भांड्याला भांडे लागतंच. पण संशयाचं भूत किंवा दोन मिनिटांचा राग हा संसार बेचिराख करून टाकतं. बेंगळुरूतही अशीच एक घटना घडली. रागाच्या भरात हातून झालेल्या एका चुकीनं ४ वर्षांचा सुखी संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. हेगनहल्ली येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणानं कौटुंबिक वाद झाल्यानंतर पत्नीला मारहाण केली. पण वर्मी घाव बसला आणि तिचा श्वास थांबला. तिचा मृत्यू झाल्याचं समजताच घाबरून पतीनंही आयुष्याचा दोर कापला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.

बेंगळुरूच्या राजेश्वरीनगरातील हेगनहल्ली परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आदल्या रात्री पद्मावती आणि सुमंत जैन या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणांवरून वाद झाला. वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. सुमंतचा पारा चढल्यानंतर त्यानं पत्नी पद्मावतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. ती जागीच कोसळली. बराच वेळ झाला तरी पत्नीची काहीही हालचाल दिसून आली नाही. राग शांत झाल्यानंतर तो भानावर आला. त्यानं तिला बराच वेळ आवाज दिला. पण ती काही प्रतिसाद देत नव्हती. मारहाण केल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यावेळी तो हादरून गेला.

Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; पतीच्या मारहाणीमुळं पत्नीनं सोडला जीव, नंतर स्वतःनंही मृत्यूला कवटाळलं
Crime: IPS अधिकाऱ्याच्या आईची हत्या, घरामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

भीतीनं घामाघूम झालेल्या सुमंतनं सर्वात आधी त्याच्या आईला फोन केला. घडलेली सर्व घटना त्यानं आईला सांगितली. मी सुद्धा आत्महत्या करतोय, असा मेसेज त्यानं आईला मोबाइलवर पाठवला. काही वेळानं त्यानंही आत्महत्या केली. सुमंत एका नामांकित कंपनीत सिव्हिल इंजिनीअर, तर त्याची बायको एका कॅब कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. दोघांच्या लग्नाला अवघी ४ वर्षे झाली होती.

Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; पतीच्या मारहाणीमुळं पत्नीनं सोडला जीव, नंतर स्वतःनंही मृत्यूला कवटाळलं
Pune : पैशांसाठी ढसाढसा रडला, उत्तर प्रदेशच्या तरुणाने पुण्यात स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला

मुलाचा मेसेज बघितल्यानंतर आईनं तातडीनं त्याच्या घरी धाव घेतली. ती घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. सुमंतचा मृतदेह घरात आढळून आला. तिनं तातडीने राजागोपाल नगर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. महिलेच्या मृत्यूबाबत संशय असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com