पुणे हादरलं ! एका घरात आढळले आईसह दोन मुलांचे मृतदेह

Pune Crime News : पुण्यातील वाकड परिसरातील ताथवडे येथे एका घरात आई आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
Pune Crime News
Pune Wakad mother and two children found dead
Published On
Summary
  • ताथवडे परिसरातील एका घरात आई आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले.

  • मृतांमध्ये ३५ वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगी आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे.

  • घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनधी

पुण्यातील वाकड परिसरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील ताथवडे गावातील एका घरात महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ते तिघे मायलेक असल्याचं सांगितलं जातंय. कल्पना बिपीन सूर्यवंशी वय 35 वर्ष शुभश्री बीपिन सूर्यवंशी 17 वर्षे आणि दादू बीपीन सूर्यवंशी वय 10 वर्ष अशी या तिघांची नावे आहेत. (Pune Wakad mother and two children found dead)

प्राथमिक अंदाजानुसार, कल्पना बिपीन सूर्यवंशी यांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती तेथील लोकांनी दिली आहे. कल्पना सूर्यवंशी यांनी जीवनात विषारी पदार्थ टाकालं. त्यानंतर ते मुलांना खाण्यास दिलं आणि स्वत: कल्पना यांनीही त्याचे सेवन केलं असं सांगितलं जातंय.

Pune Crime News
Pune Ketan Agrawal Death Case: पहिला प्लॅन हुकला, दुसरा सक्सेसफुल; केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतननं आखला होता प्लॅन A, B, C

क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात घरगुती वादातून एका विवाहितेचा खून झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेत पतीला अटक करण्यात आली आहे. 25 वर्षीय रुतुजा तावरेचं लग्न अक्षय रामदास तावरे याच्याशी झाला होता.

Pune Crime News
लातूर हादरले! अनैतिक संबंधामुळे वाद, तरुणाच्या तोंडावर महिलेने ओतले उकळते तेल; उपचारादरम्यान मृत्यू

मात्र लग्नानंतर काही काळापासून पतीकडून तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. पोलीस तक्रारीत नमूद केल्यानुसार, 17 जून रोजी पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा घरगुती कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्याच दरम्यान अक्षयने पत्नी रुतुजा हिचा ओढणीने गळा आवळून खून केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com