लातूर हादरले! अनैतिक संबंधामुळे वाद, तरुणाच्या तोंडावर महिलेने ओतले उकळते तेल; उपचारादरम्यान मृत्यू

Latur crime news : लातूरच्या उदगीरमध्ये अनैतिक संबंध आणि मालमत्ता वादातून २४ वर्षीय तरुणावर उकळते तेल टाकण्यात आले. गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
Latur woman arrested for boiling oil attack
Latur woman arrested for boiling oil attackसाम टीव्ही मराठी
Published On

संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Latur woman arrested for boiling oil attack : लातूरमधील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. अनैतिक संबंध आणि प्रॉपर्टी नावावर करण्याच्या वादातून एका महिलेने २४ वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते तेल टाकून त्याला गंभीर जखमी केले. या दुर्घटनेत गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लातूरमध्ये नेमकं काय घडलं?

स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण उद्धव दहीकांबळे (वय २४ वर्षे) आणि आरोपी महिला वंदना मादळे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात प्रॉपर्टी नावावर करण्यावरून तीव्र वाद सुरू होता. दोघांमध्ये दररोज खटके उडत होते.

Latur woman arrested for boiling oil attack
Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबई'; लोकल सेवा ठप्प, मुंबईसह उपनगरांना 'रेड अलर्ट'

उकळते तेल तोंडावर ओतले -

उद्धव आणि वंदना यांच्यातील हाच वाद विकोपाला गेला. त्यामुळे संतापलेल्या वंदना मादळे हिने उद्धव दहीकांबळे यांच्या तोंडावर थेट उकळते तेल ओतले. या जीवघेण्या हल्ल्यात उद्धव गंभीररित्या भाजले गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Latur woman arrested for boiling oil attack
Mumbai Rains: दादार स्थानकात जिकडे तिकडे पाणीच पाणी; मुंबई, पालघरला 'रेड' अलर्ट, पुढचे ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

पोलिसांची धडक कारवाई -

या धक्कादायक प्रकारानंतर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी महिला वंदना मादळे हिला ताब्यात घेतले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणानंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करत आहेत.

Latur woman arrested for boiling oil attack
Police Transfers : राज्यात मोठा प्रशासनिक बदल! ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, २२४ निरीक्षकांना पदोन्नती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com