Maharashtra police officers transfer list : महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या आणि पदोन्नती करण्यात आल्या असून पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. राज्य पोलीस सेवेतील एकूण ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या फेरबदलांतर्गत मुंबईमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण २२४ पोलीस निरीक्षकांना (Police Inspectors) पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या एकूण अधिकाऱ्यांमध्ये एकट्या मुंबईतील ७६ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या मोठ्या फेरबदलांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.