

पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
दोन तरुणांनी अपरहण करून केलं भयंकर कृत्य
मुलीचा पाठलाग करूण आरोपी द्यायचे मानसिक त्रास
पुण्यातील नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सोरतापवाडीत नर्सरीत काम करणाऱ्या मुलीवर २ तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. या घटनेमुळे पुणे हादरले.
सोरतापवाडी हवेली ग्रामपंचायत हद्दीत एका नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला. उरुळीकांचन पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. हे आरोपी हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ शिवा फार्म येथे राहणारे आहेत. आरोपींनी अपहरण करून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) पोक्सो , ७४,३५१(२) ३,(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला नेऊन या दोन्ही आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. संबंधित मुलीचा आरोपी वारंवार पाठलाग करायचे. तिला 'आय लव्ह यू' बोलून मानसिक त्रास देत होते. आरोपी आणि त्याच्या मित्राने मिळून तरुणीला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिला मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोळ्याला ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे हे करत आहे.
दरम्यान, पुण्यातील गणेश पेठेत पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ४७ वर्षीय आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांकडून दुकानदाराला ताब्यात घेतलं. फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत मुलीला दुकानात बोलवून घेत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. चिमुकलीच्या गोष्ट लक्षात येताच तिने आरडा ओरड करत स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.