Solapur : सोलापूर हादरले! ११ वर्षीय मुलावर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Solapur Rape Case Crime News : सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
SOLAPUR POCSO CASE: 11 YEAR OLD BOY ASSAULT CASE ACCUSED ARRESTED BY POLICE
SOLAPUR POCSO CASE: 11 YEAR OLD BOY ASSAULT CASE ACCUSED ARRESTED BY POLICESaam Tv
Published On
Summary
  • सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

  • महिलेच्या सतर्कतेमुळे आरोपीचा प्रकार समोर आला आणि बालकाची सुटका झाली

  • आरोपीला अटक

  • आरोपीवर POCSO कायद्यासह गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल

सोलापूर शहरातून पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी सिद्धाराम उर्फ सिद्धया सलगर या आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाला आरोपीने आपल्या घरी नेले. त्यानंतर बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या बालकाने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरातील एका महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. संशय आल्याने तिने तात्काळ आरडाओरड केली आणि नागरिकांना बोलावले. महिलेचा आवाज ऐकताच आरोपीने बालकाला सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

SOLAPUR POCSO CASE: 11 YEAR OLD BOY ASSAULT CASE ACCUSED ARRESTED BY POLICE
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) तसेच इतर गंभीर कलमांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

SOLAPUR POCSO CASE: 11 YEAR OLD BOY ASSAULT CASE ACCUSED ARRESTED BY POLICE
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती तपासली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com