कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मामेभावाने मुलीवर केला बलात्कार
वडील आणि मामाने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. मामेभावाने हे भयंकर कृत्य केलं. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनी आणि मामाने देखील तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडितेच्या वडील आणि मामांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तर पीडितेचा मामेभाऊ अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
कोल्हापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच अल्पवयीन मामेभावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणातील पीडितेसोबत तिच्या वडील आणि मामाने देखील अश्लील वर्तन केले. पीडित मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्या या प्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचे वडील आणि मामा या दोघांना अटक केली. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी या दोघांना पोलिस कोठडी सुनावली.
कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मामाच्या मुलाने पीडतेवर बलात्कार केला. जन्मदात्या वडिलाने आणि मामाने मुलीशी अश्लील वर्तन केले. एकदा दोनदा नाही तर गेल्या ५ वर्षांत असे अनेक वेळा घडले. त्यामुळे पीडित मुलीची आई तिला घेऊन घर सोडून निघून गेली होती. अखेर या त्रासाला कंटाळून पीडीतेच्या आईने मंगळवारी फिर्याद दिली. त्यानंतर वडील आणि मामाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे कोल्हापुरमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींची चौकशी करत आहेत.
दरम्यान, कोल्हापुरमध्ये क्राइम ब्रांचकडून ठाणे पालिकेतील माजी मोठ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. महेश आहेर असं या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते. अखेर कोल्हापूरच्या लोकल क्राइम ब्रांचने त्यांना अटक केली. महेश आहेरसोबत त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महेश आहेर यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर ते पोलिसांच्या रडारवर होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.