Konkan Crime: सावंतवाडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, दगड खाण मालकाने रक्त येईपर्यंत केली मारहाण; VIDEO व्हायरल

Social Activist Attacked in Sawantwadi: कोकणातल्या सावंतवाडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे सुरू असलेल्या काळा दगड खाण परिसरात पाहणी करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खाण मालक आणि त्याच्या कामगारांनी हल्ला करून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गंभीर घटनेत पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या वेत्ये गावातील काळ्या दगड खाणीवर महसूल विभागाची टीम तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी २ सामाजिक कार्यकर्तेही त्या ठिकाणी गेले होते. दरम्यान, "तुम्ही आमच्या खासगी हद्दीत का आलात?" असा जाब विचारत संबंधित खाण मालक आणि त्याच्या कामगारांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ​व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण एका गाडीतील व्यक्तीला मारहाण करताना आणि एक व्यक्ती मारण्यासाठी दगड उचलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या वेळी काही राजकीय व्यक्तींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या हल्ल्यानंतर संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांने सावंतवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com