Crime News : पती दारू पिऊन छळ करायचा, वैतागलेल्या पत्नीने केली हत्या; जळगावातील धक्कादायक घटना

Jalgaon Crime News : जळगावातील कानळादा रोड परिसरात पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे सतत होणाऱ्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
JALGAON CRIME NEWS: WIFE KILLS HUSBAND OVER DOMESTIC DISPUTE IN KANALADA ROAD AREA
JALGAON CRIME NEWS: WIFE KILLS HUSBAND OVER DOMESTIC DISPUTE IN KANALADA ROAD AREASaam tv
Published On
Summary
  • जळगावातील कानळादा रोड परिसरात पत्नीने पतीचा खून केला

  • दारूचे व्यसन असल्याने घरात सतत वाद

  • पत्नीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली

  • पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून पुढील तपास सुरू

संजय महाजन, जळगाव

जळगाव शहरातील कानळादा रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या कौटुंबिक वाद आणि पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भरत नामदेव पाटील (वय ५०) असे मृत पतीचे नाव आहे. तर मनीषा भरत पाटील (वय ४५) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत पाटील यांना दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे घरात वारंवार वाद होत होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर ते पत्नीला त्रास देत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. अखेर या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

JALGAON CRIME NEWS: WIFE KILLS HUSBAND OVER DOMESTIC DISPUTE IN KANALADA ROAD AREA
Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

घटनेच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मनीषा पाटील यांनी पतीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत भरत पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

JALGAON CRIME NEWS: WIFE KILLS HUSBAND OVER DOMESTIC DISPUTE IN KANALADA ROAD AREA
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने आणि श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करत आरोपी पत्नीला अटक केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com