IPS transfer : पुण्यातील IPS शिंदे-पिंगळेंची बदली, आता कुठे मिळाली नियुक्ती? वाचा सविस्तर

Maharashtra Police transfer list : महाराष्ट्र गृह विभागाने ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पुण्याचे डीसीपी निखिल पिंगळे साताऱ्याचे एसपी झाले आहेत. वाचा संपूर्ण यादी
Maharashtra IPS officers transfer order announcement with names and new postings of Nikhil Pingale, Rajkumar Shinde, Tushar Doshi, and other police officials
IPS officers Nikhil Pingale and Rajkumar Shinde among 9 officers transferred in major Maharashtra police reshuffle by the Home Department, April 2026.Saam TV Marathi
Published On

Maharashtra IPS officer transfer list : राज्य सरकारच्या गृह विभागाने पुन्हा एकदा पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. आज सायंकाळी राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील दोन पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे. त्याशिवाय साताऱ्यातील तुषार दोषी यांची सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह विभागाने नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले अन् पोलीस दलात खळबळ उडाली. यामध्ये पुणे शहर पोलिस दलात कार्यरत गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर, पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशीम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली झाली आहे. त्यांच्याकडे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Maharashtra IPS officers transfer order announcement with names and new postings of Nikhil Pingale, Rajkumar Shinde, Tushar Doshi, and other police officials
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

कोणत्या ९ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या?

  • तुषार दोशी : सातारा → सांगली (पोलीस अधीक्षक)

  • निखिल पिंगळे : पुणे (DCP) → सातारा (SP)

  • संदीप घुगे : सांगली (SP) → DCP सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

  • योगेश गुप्ता : कोल्हापूर (SP) → DIG, गडचिरोली परिक्षेत्र (अतिरिक्त जबाबदारी)

  • निलोत्पल : गडचिरोली (SP) → कोल्हापूर (SP)

  • एम. रमेश : अपर SP, गडचिरोली → SP, गडचिरोली

  • महेश्वर रेड्डी : जळगाव (SP) → राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

  • श्रीकांत ढिवरे : धुळे (SP) → जळगाव (SP)

  • राजकुमार शिंदे : पुणे (DCP) → वाशिम (SP)

Maharashtra IPS officers transfer order announcement with names and new postings of Nikhil Pingale, Rajkumar Shinde, Tushar Doshi, and other police officials
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, इंजिनिअरने २ दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी

साताऱ्यातील तुषार दोशींची बदली -

सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. साताऱ्याची जबाबदारी आता निखील पिंगळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर असतानाच ही मोठी घडामोड घडली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याची झाली होती मागणी. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीच्या रजेवर पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांना काही दिवस पाठवले होते. त्यानंतर आज अचानक तुषार दोशी यांची बदली सांगलीत करण्यात आली आहे.

Maharashtra IPS officers transfer order announcement with names and new postings of Nikhil Pingale, Rajkumar Shinde, Tushar Doshi, and other police officials
Ladki Bahin Yojana : कामाची बातमी! इतक्या लाख लाडक्या बहि‍णींची खाती बंद, लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही ना? ३० एप्रिलपर्यंत आणखी एक संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com