सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Pune Katraj ghat bus rickshaw accident details today : पुण्यात कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळ कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षा यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षा पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर जाला. तर या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. तर रिक्षा पुण्याकडे येत होती. त्यावेळी कात्रज घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर रिक्षा रस्त्यावर पलटी होऊन चेंदामेंदा झाला. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
कात्राच घाटात अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र,रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत.
मृत रिक्षाचालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.