Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Pune Bike and Bus Accident Video: पुण्यामध्ये दुचाकीला भरधाव बसने धडक दिली. बसच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO
Pune AccidentSaam Tv
Published On

Summary:

  • पुण्यात भीषण रस्ते अपघात झाला

  • पुणे- नगर महामार्गावर भरधाव बसने दुचाकीला चिरडले

  • अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू

  • अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

पुण्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव बसने दुचाकीला चिरडलं. पुणे- नगर महामार्गावर शिक्रापूर येथे ही घटना घडली. या अपघाताचा थरार रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळच्या शिक्रापूर येथे पुणे- नगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महेश धोंडीराम भगत (४४ वर्षे) यांचा मृत्यू झाला. महेश दुचाकीवरून जात होते. महामार्गावर वळण घेत असताना भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दुचाकी दूरवर फेकली गेली. अंगावरून बस गेल्यामुळे महेश यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर बस चालकाने न थांबता बस घेऊन फरार झाला.

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO
Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेशला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेश भगत यांच्या मृत्यूमुळे शिक्रापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची बातमी कळताच शिक्रापूर येथील मित्र परिवारानी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO
Pune Accident : सिंहगडावर जाताना घाटात टेम्पोचा अपघात, ५ जणांसह १५० फूट दरीत कोसळला

दरम्यान, पुणे- अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापुर कोंढापुरी या ठिकाणी आणखी एक अपघात झाला आहे. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चुराडा झाला. या अपघातामध्ये सचिन आडे यांचा मृत्यू झाला. पुणे-नगर महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघांचा मृ्त्यू झाला. पोलिस या दोन्ही अपघातांचा तपास करत आहेत.

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO
Accident : शेतात कामासाठी निघाले,पण वाटेतच काळाचा घाला; पुण्यात भीषण अपघातात नवरा-बायकोचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com