Pune Highway: तळेगाव-चाकण-शिक्रापूर , हडपसर- यवत महामार्गाला मंजुरी; लवकरच सुरु होणार काम

Talegaon-Chakan-Shikrapur and Hadapsar Yavat Highway: पुण्यात दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग ते हडपसर- यवत महामार्गाचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे.
Pune Highway
Pune HighwaySaam Tv
Published On
Summary

पुण्यातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग

हडपसर- यवत महामार्गाचे काम सुरु होणार

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने पुणे जिल्ह्यात दोन नवीन प्रकल्प हाती घेतले आहे. यामध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग ते हडपसर- यवत महामार्गाचा समावेश आहे. हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यांचा प्रोजेक्ट मोंटेकार्ले कंपनीला देण्यात आली आहे.

आता लवकरत निविदा अंतिम केली जाणार आहे. यानंतर महिन्याभरात दोन्ही प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे.

Pune Highway
Mumbai-Pune Expressway: नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट, एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक कधी सुरू होणार? तारीख आली समोर

काय आहे प्रकल्प?

MSIDC तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ५४८ डीच्या दुरुस्तीचे काम दोन टप्प्यात होणार आहे. एकूण ५३.२०० किमी लांबीचा हा रस्ते असणार आहे. यातील २४.२०० किमीचा टप्पा उन्नत असणार आहे. तर उरलेला टप्पा जमिनीला समांतर असणार आहे. आता या कामाचे कंत्राट मोंटेकार्लो लिमिटेड कंपनीला मिळालं आहे.

Pune Highway
Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

२-३ वर्षात होणार काम पूर्ण

मोंटेकार्लो कंपनीला अजून एक कंत्राट मिळालं आहे. एमएसआयडीसीकडून हडपसर-यवत अशा उन्ना मार्गिकेचीही काम होणार आहे. यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरुल वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सहा पदरी उन्नत महामार्ग बांधला जाणार आहे. त्याचसोबत सध्याच्या रस्त्याचे सहा पदरीकरण केले जाणार आहे.आता दोन्ही प्रकल्पांच्या निविदेचा प्रस्ताप राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर काम सुरु होईल. हे दोन्ही प्रकल्प २-३ वर्षात वाहनचाकांसाठी सुरु करण्याचे नियोजन आहे.

Pune Highway
Pune Nashik Highway: ऊसाच्या ट्रकखाली अडकली कार, पाहा थरारक अपघात|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com