Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू

Shikrapur Truck And Bike Accident: शिक्रापूर - चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. शाळेमध्ये जात असताना चिमुकल्यांवर काळाने घाला घातला. अपघातामध्ये बापासह दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला.
Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू
Shikrapur Truck And Bike AccidentSaam Tv
Published On

शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना ट्रकने चिरडल्याची घटना पुण्यानजीकच्या शिक्रापूर येथे घडली आहे. दुचाकीवरून शाळेमध्ये जात असताना ही घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. शिक्रापूर - चाकण महामार्गावर ही घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर - चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. शाळेमध्ये जात असताना चिमुकल्यांवर काळाने घाला घातला. दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू
Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गणेश खेडकर या तरुणासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच मुलांना आपला जीव गमवावा लागला.

Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू
Palghar Road Accident : महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

गणेश खेडकर या तरुणासह तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी मृतांची नावं आहेत. तन्मय तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम दुसरीमध्ये शिकत होता. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू
jammu kashmir truck accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; ४ जवानांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com