jammu kashmir truck accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; ४ जवानांचा मृत्यू

jammu kashmir truck accident update : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ जवानांचा मृत्यू झाला आहे.
 जम्मू-काश्मीर
jammu kashmir truck accident Saam tv
Published On

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शनिवारी लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. लष्कराच्या ट्रकच्या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेने जवानांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 जम्मू-काश्मीर
Mumbai Accident: टँकरची जबरदस्त धडक; ६ कार थेट खाडीत; भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास ट्रक डोंगरावरून कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अपघातात ४ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बांदीपोरा येथून सदर कूट पायीन भागातून जाताना अपघात झाला. या ट्रकमधील चालकाचं वाहनावरील नियंत्रण गमावल्याने अपघात झाला आहे'.

 जम्मू-काश्मीर
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, दीर भावजयाचा अपघाती मृत्यू, कारच्या धडकेत दुर्देवी अंत

'या अपघातात ४ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत', असेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, २४ डिसेंबर रोजी पूंछ जिल्ह्यातील LoC जवळ सैन्य दलाचं वाहन ३०० फूट दरीत कोसळून अपघात झाला होता. या दुर्घटनेत ५ सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर चालकासहित ५ जवान गंभीर जखमी झाले होते. सैन्य दलाने याबाबत सांगितलं की, २.५ टन वजनाचं वाहन, सहा वाहनांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला होता. पुंछजवळ ऑपरेशनल ट्रक हा रस्त्यावरून अचानक दरीत कोसळला होता.

 जम्मू-काश्मीर
PUBG Train Accident: रेल्वे रूळावर बसून पबजी खेळत होते, रेल्वेनं उडवलं; तिघांचा मृत्यू

राजौरी जिल्ह्यातील एका वाहनाचा दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात १ जवानाचा मृत्यू झाला होता. तर एक जण जखमी झाला होता. २ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या अपघातात कारच अपघात झाला होता. या अपघात एक महिला आणि तिच्या १० महिन्यांच्या मुलासहित तिघांचा मृत्यू झाला होता. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com