Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Pune School Bus And Bike Accident: पुण्यात भरधाव स्कूल बसने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले होते. भावाचा उपचारादम्यान मृत्यू झाला.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Pune Accident Saam Tv
Published On: 
  • पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

  • घोरपडीत स्कूल बसने दुचाकीला धडक दिली

  • वॉर मेमोरियल चौकात स्कूल घडली घटना

  • स्कूल बस चालकाविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. स्कूल बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पुण्यातील घोरपडी परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण-भावाला स्कूल बसने धडक दिली. या अपघातामध्ये बसच्या चाकाखाली चिरडून बहिणीच्या डोळ्यासमोर भावाचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी स्कूल बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणारे बहीण-भाऊ रस्त्यावर खाली पडले. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Accident: भीषण अपघात! कार खोल दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

रोहित लक्ष्मण कुदळे (वय १६ वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. रिया लक्ष्मण कुदळे (वय १८ वर्षे) असे जखमी तरुणीचे नाव आहे. मांजरी परिसरातील रहिवासी रिया लक्ष्मण कुदळे स्कूटर चालवत होती. तिचा भाऊ रोहित मागे बसला होता. दरम्यान वॉर मेमोरियल चौकात भरधाव वेगाने आलेल्या मिनी स्कूल बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Accident: रस्त्यावर CCTV लावत असताना भयंकर अपघात, भरधाव ट्रकने एचआर मॅनेजरसह ६ जणांना चिरडलं

या अपघातात रिया आणि रोहित दोघेही गंभीर जखमी झाले. रोहितचा रात्री उशिरा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या रियावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्कूल बसचालक सागरने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालविल्याचा आरोप आहे.या प्रकरणी रिया कुदळेच्या तक्रारीवरून वानवडी पोलिस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com